Welcome to the Hall of Fame

Craft narratives ✍️ that ignite
inspiration 🥋, knowledge 📜, and victory 🏆

एसआरके तायक्वांदो क्लबच्या द्वितीय शाखेचे कुवारबाव येथे दिमाखात उद्घाटन
Event
SRK Club • Aug 8, 2026

एसआरके तायक्वांदो क्लबच्या द्वितीय शाखेचे कुवारबाव येथे दिमाखात उद्घाटन

रत्नागिरी दि. ८ ऑगस्ट २०२६ : कुवारबाव येथे एसआरके तायक्वांदो क्लबच्या द्वितीय शाखेचा उद्घाटन समारंभ शनिवारी सायंकाळी ५ वाजता उत्साहात व दिमाखदार वातावरणात पार पडला. या उद्घाटन समारंभास माननीय नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे नगरसेविका प्रीती सुर्वे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी एसआरके तायक्वांदो क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत उपाध्यक्ष वीरेश मयेकर सचिव शितल खामकर कोषाध्यक्ष अंजली सावंत तसेच सदस्य प्रफुल्ल हातिसकर यांच्यासह क्लबचे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू पालक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिल्पा सुर्वे यांनी एसआरके तायक्वांदो क्लबच्या कार्याचे कौतुक केले. एखाद्या संस्थेची शाखा सुरू होणे ही केवळ सुरुवात नसून त्या संस्थेने घडविलेले राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हीच त्या संस्थेच्या कार्याची खरी पावती आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच क्लबच्या खेळाडूंना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तायक्वांदोच्या माध्यमातून अधिकाधिक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरीचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी एसआरके तायक्वांदो क्लबचा आंतरराष्ट्रीय खेळाडू अमेय अमोल सावंत याने नुकत्याच झालेल्या ९व्या हिरो आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा पटाया थायलंड येथे उल्लेखनीय कामगिरी करत रौप्यपदक (Silver Medal) पटकावल्याबद्दल क्लबच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. अमेयच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवर प्रशिक्षक पालक व खेळाडूंनी त्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कुवारबाव येथे सुरू झालेल्या या द्वितीय शाखेमुळे परिसरातील मुला-मुलींना तायक्वांदोचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याची तसेच जिल्हा राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. एसआरके तायक्वांदो क्लबच्या द्वितीय शाखेच्या उद्घाटनाचा हा सोहळा क्लबचे प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू पालक व खेळाडू यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्साहात पार पडला. या नव्या शाखेच्या माध्यमातून भविष्यात आणखी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Event•4 min read

Latest News

SRK • Jul 23, 2026

🏆 SILVER MEDAL FOR AMEY SAWANT! 🥈 at the Hero’s International Taekwondo Championship 2026 in Pattaya City Thailand

🏆 SILVER MEDAL FOR AMEY SAWANT! 🥈 Proud moment for AMEY SAWANT of SRK Taekwondo Club Ratnagiri who secured the Silver Medal at the Hero’s International Taekwondo Championship 2026 in Pattaya City Thailand. 🇮🇳🇹🇭 Despite taking the lead in the final match Amey was unfortunately forced to withdraw due to a leg injury. His courage fighting spirit and determination on the international stage are truly commendable. 💪🥋 Proud of you Amey! Keep Fighting Keep Rising! 🇮🇳

Tournament•1 min read
SRK • Jul 12, 2026

जिल्हा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत एसआरके क्लबची तिसऱ्या क्रमांकावर मोहोर

देवरुख येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा २०२६ मध्ये एसआरके क्लबच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वर्चस्व गाजवत स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. क्लबच्या खेळाडूंनी विविध वजनी गटांत पदकांची लयलूट करत यश संपादन केले. या स्पर्धेत अमेय सावंत सामर्थ्य बाने श्लोक पाटील वरद माने गार्गी घडशी आयुष चव्हाण अर्जुन पवार प्रांजल लांजेकर रोमा तापेकर श्रेया लिंगायत स्वरा साखळकर मृण्मयी वायंगणकर स्वर्णिका रसाळ आणि आरुष सोनार या खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकून आपल्या क्लबचा नावलौकिक वाढवला. एसआरके क्लबच्या खेळाडूंनी सुवर्णपदकांसोबतच अन्य गटांतही चमकदार कामगिरी केली. स्पृहा सावंत आयुष कोळेकर तिर्था लिंगायत आश्वी पाथरे विधि माने श्रीयांश हातिस्कर आणि आरवी नार्वेकर यांनी रौप्यपदकाची कमाई केली. तसेच मृदुला पाटील अनन्या चव्हाण हर्ष रसाळ रोहित कुंडकर श्रीयांश देसाई वीरा कडू शर्ली मलुष्टे तिर्था लिंगायत वेदिका पवार आणि विनायक पवार यांनी कांस्यपदके जिंकून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. क्लबच्या या अभूतपूर्व यशाबद्दलस्पर्धेत यशस्वी झालेल्या या खेळाडूंच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा कोषाध्यक्ष शशांक घडशी अध्यक्ष अमोल सावंत उपाध्यक्ष वीरेश मयेकर सचिव शीतल खामकर कोषाध्यक्ष अंजली सावंत निखिल सावंत प्रफुल्ल हतिसकर आणि समस्त पालकवर्ग प्रशिक्षक आणि पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Competition•3 min read
SRK • Apr 28, 2026

VICTORY CUP 6TH OPEN MAHARASHTRA STATE TAEKWONDO CHAMPION 🏆 VIRAR* 2026

*VICTORY CUP 6TH OPAN MAHARASHTRA STATE TAEKWONDO CHAMPION 🏆 VIRAR 2026* 3rd place ALL OVER Ratnagiri district 1ST DAY RESULT *SUB JR UNDER 8 YEARS* SILVER MEDAL 🥈 1.SHRIYANSH HATISKAR *SUB JR UNDER 10 YEARS* GOLD MEDAL 🥇 ROHIT KUNDKAR TULJA HARSHE GARGI GHADSHI SILVER MEDAL 🥈 1.SHRIYANSH HATISKAR 2.NIRMIT SAWANT *SUB JR UNDER 12 YEARS* GOLD MEDAL 🥇 1.ROHIT KUNDKAR 2.ARJUN PAWAR 3.PRANJAL LANJEKAR BRONZE MEDAL🥉 1.SHREYA LINGAYAT 2.CHITANYA DESHMUKH *VICTORY CUP 6TH OPAN MAHARASHTRA STATE TAEKWONDO CHAMPION 🏆 VIRAR* 2nd RESULT CADET GOLD MEDAL 🥇 SWARA SAKHALKAR MERUNMAYEE WAIGANKAR SILVER MEDAL 🥈 ARJUN PAWAR PRANJAL LANJEKR JUNIOR GOLD MEDAL 🥇 SWARA SAKHALKAR SILVER MEDAL🥈 MERUNMAYEE WAIGANKAR SHREYASI HATISKAR POOMASE SILVER 🥈 SWARA SAKHALKAR

Tournament•2 min read
SRK • Apr 18, 2026

जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट व जनरेशन 3 सेंसर किट उद्घाटन संपन्न

उद्योगमंत्री मा. श्री. उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट व जनरेशन 3 सेंसर किट उद्घाटन संपन्न आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ व जनरेशन थ्री सेंसर कीट रत्नागिरी तालुक्यात उद्योग मंत्री उदय ची सामंत साहेब यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली या मॅटचे व सेंसर चे उद्घाटन दिनांक 18 एप्रिल रोजी बॅडमिंटन हॉल छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मारुती मंदिर येथे उद्योग मंत्री मा. श्री उदय सामंत जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे श्री. बीपीन बंदरकर शिवसेना जिल्हा शहरप्रमुख सौरभ मालुष्टे नगरसेवक तायक्वांदो प्रशिक्षक प्रशिक्षक शाहरुख शेख प्रशांत मकवाना मिलिंद भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. तसेच नुकत्याच झालेल्या जागतिक ब्लॅक बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना ब्लॅक बेल्ट व प्रमाणपत्र देऊन मा. श्री. उदयजी सामंत यांनी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी एस आर के व गणराज तायक्वांदो क्लबचे पदाधिकारी खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदय साहेबांचे आभार व्यक्त केले आहेत.

Event•3 min read
SRK • Apr 2, 2026

शाहरुख निसार शेख यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'बेस्ट सेमिनार रेफ्री' म्हणून अत्यंत प्रतिष्ठेच्या कुक्किवान अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

रत्नागिरी : तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडिया आण ि तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने रत्नागिरीत पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वाँदो पंच व रिफ्रेशर परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या 'एस.आर.के. तायक्वाँदो क्लब'च्या पंचांनी घवघवीत यश संपादन केले आहे. क्लबच े प्रमुख प्रशिक्षक शाहरुख निसार शेख यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल 'बेस्ट सेमिनार रेफ्री' म्हणून अत्यंत प्रतिष्ठेच्या कुक्किवान अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.

Belt Promotion•1 min read
SRK • Mar 31, 2026

राष्ट्रीय तायक्वाँदो पंच परीक्षेत एस. आर. के. क्लबचे वर्चस्व

तायक्वाँदो फेडरेशन ऑफ इंडिया आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने रत्नागिरीत पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो पंच व रिफ्रेशर परीक्षेमध्ये रत्नागिरीच्या एस.आर.के. तायक्वांदो क्लबच्या पंचांनी घवघवीत यश संपादन केले आहे. क्लबचे प्रमुख प्रशिक्षक शाहरुख निसार शेख यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेस्ट सेमिनार रेफ्री म्हणून अत्यंत प्रतिष्ठेच्या कुक्विवान अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. रत्नागिरीतील मारुती मंदिरयेथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन हॉलमध्ये ३० व ३१ मार्च २०२६ रोजी ही परीक्षा पार पडली. अखिल भारतीय स्तरावर आयोजित या परीक्षेत देशभरातून सुमारे १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. खेळाडूंचे तांत्रिक कौशल्य आणि शारीरिक क्षमता यांची अत्यंत कडक चाचणी या वेळी घेण्यात आली. एस.आर.के. तायक्वाँदो क्लबचे शाहरुख निसार शेख (बेस्ट सेमिनार रेफ्री) मिलिंद अशोक भागवत सुजल रंजीत सोळंके साहिल शैलेश आंबेरकर अमेय अमोल सावंत वेदांत सुरज चव्हाण श्रुती रामचंद्र चव्हाण समर्था सतीश बने ओम पांडुरंग अप्राज हे ९ पंच या राष्ट्रीय परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेतः उत्तीर्ण झालेल्या या सर्व पंचांना आता जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे. शाहरुख शेख यांना सेमिनारचे एक्झामिनर श्री. सुभाष पाटील आणि वेंकटेश्वरराव कररा यांच्या हस्ते कुक्किवान अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे महासचिव मिलिंद पठारे शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे जिल्हा सचिव लक्ष्मण करा यांसह मान्यवरांनी खेळाडूंचे कौतुक केले. तसेच एस.आर.के. क्लबचे अध्यक्ष अमोल सावंत उपाध्यक्ष वीरेश मयेकर सचिव शीतल खामकर कोषाध्यक्ष अंजली सावंत सदस्य प्रफुल्ल हातिसकर व निखिल सावंत यांनी पंचांच्या तयारीवर समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.

Event•4 min read
SRK • Feb 21, 2026

एसआरके तायक्वांदो क्लबचा गुणगौरव सौहळा संपन्न

रत्नागिरी: 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता एसआरके तायक्वांदो क्लब रत्नागिरीतर्फे गुणवंत खेळाडू गुणगौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमांमध्ये 2025-26 वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल 40 गुणवंत खेळाडूंना गौरव चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच या चाळीस विद्यार्थ्यांमध्ये 5 अवॉर्ड देखील देण्यात आले. स्वरा साखरकर (प्लेयर ऑफ द इअर) स्वरा साखळकर (मोस्ट चॅम्पियनशिप प्लेअर) अरवी नार्वेकर(मोस्ट कन्सिस्टन्सी प्लेअर) स्पृहा सावंत (मोस्ट सिन्सीअर प्लेअर) अर्जुन पवार (अपकमिंग प्लेअर) त्याचबरोबर श्रुती चव्हाण स्वरा साखळकर मृदुला पाटील या तीन राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर एसआरके तायक्वांदो क्लबचे ऑफिशियल वेबसाईट व स्वतंत्र उद्घाटन नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. एक आधुनिक डिजिटल प्रणाली आहे जी क्लबचे काम अधिक सोपे व्यवस्थित आणि जलद करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. या सिस्टममध्ये पब्लिक वेबसाईड आणि ॲडमीन मोबाईल ॲप या दोन मुख्य भागांचा समावेश आहे. सार्वजनिक वेबसाइटवर क्लबची माहिती विद्यार्थ्यांची अचिवमेंट्स स्पर्धांचे फोटो गॅलरी आणि महत्त्वाचे अपडेट्स सहज पाहता येतात. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी कधीही व कुठूनही क्लबशी जोडलेले राहू शकतात आणि विद्यार्थ्यांच्या यशाची सर्वांसमोर माहिती मिळते. दुसरीकडे ग्रुप ॲडमीन ॲप च्या मदतीने प्रशिक्षक आणि अ‍ॅडमिन मोबाईलवरूनच विद्यार्थ्यांची माहिती व्यवस्थापित करू शकतात उपस्थिती नोंद करू शकतात आणि नवीन फोटो किंवा अचिवमेंट्स लगेच वेबसाइटवर अपडेट करू शकतात. यामुळे कागदी नोंदीची गरज कमी होते आणि सर्व माहिती सुरक्षितपणे डिजिटल स्वरूपात जतन होते. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना अनेक फायदे मिळतात. त्यांच्या उपस्थितीची योग्य नोंद ठेवली जाते त्यांच्या प्रगतीची माहिती व्यवस्थित जतन होते त्यांच्या अचिवमेंट्स सर्वांना पाहता येतात आणि त्यांना वेळेवर महत्त्वाचे अपडेट्स मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळते आणि त्यांना एक आधुनिक व व्यवस्थित क्रीडा प्रशिक्षणाचा अनुभव मिळतो. कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा मा शिल्पा सुर्वे जिल्हा परिषद सदस्य प्रीती सुर्वे नगरसेविका सौ पूजा पवार तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा रत्नागिरी जिल्ह्याचे कोषाध्यक्ष शशांक घडशी आंतरराष्ट्रीय खेळाडू ऐश्वर्या सावंत क्लब अध्यक्ष अमोल सावंत नियोजन समिती प्रमुख प्रफुल्ल हातिसकर प्रशिक्षक शाहरुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अम्रिता केतन वारणकर सीटी राईड मधुसूदन भुर्के विलास अनंत चव्हाण रोशन दामोदर मयेकर साहिल राजेंद्र मयेकर अमेय विरकर(अमेय ज्वेलर्स) विद्या धोत्रेकर यांचे सहकार्य लाभले. राधीका कुंडकर शुभांगी तापेकर सांची पाटील यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

Event•5 min read
SRK • Feb 8, 2026

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत एसआरके तायक्वांदो क्लबची दमदार कामगिरी

रत्नागिरी येथे ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या १९ व्या जिल्हास्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धेत 'एस.आर.के. तायक्वांदो क्लब'च्या खेळाडूंनी देदिप्यमान यश संपादन केले आहे. या क्लबने एकूण ३९ पदके जिंकून क्योरुगी प्रकारात तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. स्पर्धेतील यशाचा तपशील खालीलप्रमाणे आहे: पदक तालिका सुवर्ण पदके: २२ रौप्य पदके: १० कांस्य पदके: ७ विजेते खेळाडू सुवर्णपदक: श्रीयांश हातिसकर श्रेया लिंगायत प्रांजल लांजेकर स्पृहा सावंत श्रेयसी हातिसकर मृण्मयी वायंगणकर (आणि ज्युनिअर) स्वरा साखळकर (आणि ज्युनिअर) सार्थक चव्हाण (आणि सिनियर) वेदांत चव्हाण सुजल सोलंकी अमेय सावंत श्रुती चव्हाण सान्वी मयेकर (आणि सिनियर) दिया रणसे गार्गी घडशी श्लोक पाटील चैतन्य धुपकर मानस शिवगण. रौप्यपदक: आरवी नार्वेकर रवी वारंग निर्मित सावंत अर्ध्य बने अर्जुन पवार स्वर्णिका रसाळ पार्थ गवाडे देवण सुपाळ समर्थ बने प्रश्वी लकेश्री तुळजा हर्षे वेदिका भोसले ओजस भोसले राज गोरे. कांस्यपदक: स्वरा साखळकर मृदुला पाटील पार्थ गुरव तीर्था लिंगायत चैतन्य कडू विधान कांबळे मृण्मयी वायंगणकर. मार्गदर्शन आणि सत्कार या खेळाडूंना प्रशिक्षक शाहरुख शेख व मिलिंद भागवत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच वेदांत चव्हाण सुजल सोलंकी अमेय सावंत यांसह अन्य सहकाऱ्यांनी संघ प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे खजिनदार व्यंकटेशराव कररा जिल्हा सचिव लक्ष्मण कररा आणि क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व पालकांचे अभिनंदन करून भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Competition•3 min read